Friday, January 1, 2010

भीक

भीक

प्रत्येकाकड़े थोड्याफार प्रमाणात जो अस्तो तो पैसा. आजच्या जगात पैसा कम्वाय्चे दोनच प्रकार मेहनत, मजूरी किव्वा चोरी.

मेहनत केली की पैसा मिळतो, आणि जास्त मेहनत केली की जास्त पैसा, आणि त्याहुन अधिक मेहनत करुण जर चोरी केली(मग ती कोणत्याही स्वरुपाची असो ) की मग सर्वाधिक पैसा मिळतो, पण तो कितीही मिळाला तरी तो कोणा न कोणा पेक्षा कमीच वाटतो.

त्यामुले आपल्या पेक्ष्या जास्त ज्याकड़े आहे त्याचा हेवा, कमी ज्याकडे आहे त्याचा मत्सर, आणि ज्याच्याकड़े बिल्कुलच नाही त्याचा, त्याचा तर तिरस्कार वाटतो.

आसेच एखाद्या ट्राफिक सिग्नलवर येउन जेव्हा तुम्ह्ची गाड़ी थाम्बते तेव्हा, मलालेली कपडे, विखुरलेले केस, घनेरडा चेहरा करुण, आणि त्याहुन घनेरडया अवस्तेत असणारे असे एखादे लेकरु कडेवर घेउन एखादी बाई किव्वा
एखादी मध्यम वयाच्या माणसाची आकृति शेजारी येउन उभी राहते तेव्हा आपले तोंड वाकडे होते,

कारण ती व्यक्ति आपल्या कड़े पैसे मागते, अपेक्षा साधारण १ ते २ रुपयाची, अगदी ५० पैसे सुद्धा चालतात, ज्या ५० पैश्याची आधुनिक अश्या, शहरात रहनारया, शेकडो रूपये किमतीचे पिज्ज़ा बर्गर खानारया सुशीक्षित माणसाला किम्मत नसते.

आता साधारणच आपल्या पेक्षा कमी पैसा असनार्याला जास्त पैसे न देणे, ह्यातच जास्त हुशारी समजनारा हा तो सुशिक्षित मानुस. हे पटत नसेल सुशिक्षित माणसाला, पण एक साधे उधाहरण आहे. एखाद्या शेतकरी भाजी विकनारया आज्जी ला आपण कोथिबिरिची जुडी "आहो आज्जी ४ रुपये किती महाग ज्हाले, ३ रुपयानी दया" असे सहजपणे म्हणून जातो. जो एक रूपया वाचवून आपल्याला जास्त काही फरक पडत नाही तरीही. पण तोच हा शुशिक्षित मानुस चकाचक दिसणार्या दुकानात १२०० रुपयाचे शर्ट "आहो १००० रुपयात देता का?" आसे म्हणत नाही.

"आहो मग काय जो कोणी रस्त्यात पैसे मागेल, त्याला काय पैसे देत सूटायाचे" असे म्हणणारे लोक ही काही कमी नसतील।आहो ह्या विषयावर तासंतास बोलायला, हजारो पान राखदायला ही भरपूर लोक तयार होतील, पण भुकेजलेल्या, वृध झालेल्या, डोळ्यात भीक मागण्याची शरम असुनही, नाइलाजाने भीक मगनार्य त्या म्हातार्या आजीला कोणी १ रूपया देणार नाही. का?

"आहो भीक मागने हा धन्दाच होउन बसला आहे आजकाल ", आहो असेलही ते खरे. पण पोटाच्या भूके साठी मेहनत वा चोरी न करता मागितलेले १/२ रुपये म्हणजे भीक. त्याप्रमाणेच दारोदारी जावून खोटी आश्वासने देऊन मगितालेले "votes". हयात अणि भीकेत मज्ह्या मते तरी काही अंत्तर नाही. आता भिक मागुन पोट भरले जातात, अणि "वोट" मागुन अजुन तरी दुसरे काय होते ? फरक मात्र फ़क्त पोटाच्या साइज़ चा.

पण १/२ रुपयाची भीक मागुन पोट भारनार्याला शिव्या, आणि "वोट" मागुन लाखोंची चोरी करनार्याला लाल दिवा ही फ़क्त अजब बात आहे.

"काही नाही, भीक मागने सोप आसते, मेहनत करायला रोग काय येतो ह्यांना" हा रीसपोंस ही काही चुकीचा नाही.
"आहो आम्ही पण मेहनत केली शिक्षण केले, आणि मगच पुड़े आलो" आसे ही साधारण प्रत्येक जन म्हणतो.
पण रस्त्यावर जन्मलेल्या त्या २/३ वर्षाच्या मुलांनी, २ हाताच्या पलिकडे न दिसणार्या थकलेल्या म्हातारिणी
मेहनत कराची तरी कषि आणि कुठे?.

मी स्वताही, शरीरिक दृशत्या ठीक ठाक असनार्याना, ज्यांना काम करण्यात काही ही प्रोब्लेम नाही. अश्यांना कधी ही भीक देत नाही. पण एक प्रसंग सांगतो "एकदा लोकल चे टिकेट घेण्यासाठी मी लाइन मधे उभा होतो, लाइन पासुनाच थोड्या दुरिवर एक मध्यम वयाची बाई एक लेकरु कडेवर घेउन भीक मागत होती, सहाजिकच त्या बाई ला भीक देणे हे माला बिलकूल योग्य वाटले नाही.

तिच्या कड़े वरचे ते बाळ भरपूर रडत होते, आता पैसे मीलन्यासाठी ती बाई त्या मुलाला रदवत आसेल आसा विचार ही एकदा मज्ह्या मनात येउन गेला. थोड्या वेलाने एक ४/५ वार्श्याची लहानशी मुलगी त्या बाई कड़े आली. मनात विचार आला "आरे हा तर फॅमिली बिज़नसच आहे.

जवळ आल्यावर त्या मुलीने आपल्या घनेद्यश्या खिशातून एक छोटी आइसक्रीम ची डबी काढली, आणि त्या ४/५ वर्षाच्या मुलीने स्वता लहान असुनही, आइसक्रीमचा मोह सोडून, त्या छोट्याश्या डबीतले आइसक्रीम त्या लहान बालास खाऊ घलन्यास सुरवात केली, भुकेज्लेले ते बाळ आइसक्रीम खाउन हसू लागले.

त्याच्ये ते मुग्ध, निरागस असे हसू पाहून विचार आला, भीकार्याच्या पोटी जन्म घेणे हा दोष काही त्या बलाचा नाही. मी आपल्या किशातले पैसे. काढले आणि त्या बाईच्या हातात ठेउन निघून गेलो.

त्या बाईच्या हातात दिलेले ते काही से रुपये, ती भीक होती का, त्या निरागस अस्या हास्याची किम्मत? हे माला माहित नाही. भीक देतांना फ़क्त एकच विचार मनात होता अणि तो म्हणजे "पैशाची किम्मत माणसापेक्षा जास्त नाही"


- पुरुषोत्तम शेटे

5 comments:

Unknown said...

Gud one....
Very true in many sense

Keep writing Bro

Gud Luck
Prakash

MyWorld said...

Sahi aahe boss ..keep it up .. all the very best :)

Unknown said...

Arey kharach mi pan rastyawar bhik magnaryana aata paise det nahi....
arey Varkari mhanun mala shivajinagar javal chya bus stop javal mi tyaala pasie dile... dusarya diwashi parat toch vyakti tithe aala... teva tyala mag ghode lavale "Varkaryanchya nava khali kay paise magtat..."
pan tuza 1 point barobar aahe.... chori karnyapekasha bhik magitalel kay vait aahe.....
Good 1....

Anonymous said...

अप्रतिम लेख आणि लिखाणाची शैलीही
एक सांगावेसे वाटते लोक ज्या विषयावर मनन करण्याची पुरेपुर टालाटाळ करतात तय विषयाला तू हात घातला आहेस..
खर्च,अंतर्मुख करायला लावण्यासारखा लेख आहे...
पुन्हा एकदा अभिनन्दन...असाच लिहित रहा..

Rakhi said...

Very nice article and true in lot of sense.Sensitive topic but really good.

Keep it up

Rakhi