Tuesday, February 22, 2011

कविता


कविता


सांगत सांगत, जरा थांबत थांबत
गेली भिडली आकाशा
तुला आडवनारा कोण, तुझ्या मनाशी ही कोण
गेली ओलांडूनी क्षितीजा

कधी सहज सहज, कधी विचार करत
लेखणीतूनी उतरे ह्या कागदा
कधी हसू होटातुन, कधी राग डोक्यामधे
दोन विचार मनी आणे माणसा

तुला लिहिणारा एक, तुला वाचणारा एक
तुला समजणारा कोणी सापडेना जगा
तुला छापे कागदातुन , तुला वीके पुस्तकातून
तुझा विचाराची किम्मत कोणी करवे कसा

तुझ्या शब्दात कळ, तुझ्या विचारत बळ
तुझा यमक भेडसी मणा
तुझा विचार निर्मळ, नाही हत्ती, हात ना कमळ
चार ओळींची ही झळ, तारसी जना


- पुरुषोत्तम शेटे