आयुषाच्या स्वप्ना मधला खेळ अजुनही संपला नहीं?
ओसाड त्या कट्ट्यावर आज ती ही नाही अन मी ही नाही.
Pocket money चे दिवस सरले, खिसा आज भरला आहे.
पण विसाव्याच्या त्या Coffee करीता आज ती ही नाही अन मी ही नाही.
घाबरत्या तिच्या स्पर्शाचा षण अजुनही सरला नाही,
गोड अश्या त्या मीठी करीता आज ती ही नाही अन मी ही नाही.
उद्याच्या त्या मी मधे, मी आज स्वतहाला पाहतो,
पण भूतकालच्या भाविशात, आज! ती ही नाही अन मी ही नाही.
लाल अश्या त्या मेहंदी मधे सुर हर्षाचे आहेत खरे,
नवजीवनाच्या आनंदात ती तर आहे, फ़क्त मीच नाही.
खरया खुरया ह्या प्रेमाला दांडगाई ही कसलीच नाही.
वेळ बदलला प्रेम बदलते, ह्या भ्रमात ती ही नाही आन मी ही नाही.